-->

आजचे भविष्य ( बुधवार, दि. ३ फेब्रुवारी २०२१)

मेष : नोकरीत नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड करतील. परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना गती येईल.

वृषभ : कामानिमित्त नवीन ओळखी होतील. घरात मोठयांचा सल्ला महत्वाचे निर्णय घेताना उपयोगी पडेल.

मिथुन : पैशाची चिंता मिटेल. तुमचा सहवास इतरांना हवाहवासा वाटेल. महिलांना अध्यात्मिक प्रगती साधता येईल.

कर्क : रेंगाळलेल्या कामांना गती येईल. तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान लाभेल. कामाचा आनंद मिळेल.

सिंह : व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करुन प्रगती करा. नवीन पद्धतीच्या कामात रस वाटेल. प्रवास घडेल.

कन्या : खेळत्या भांडवलाची सोयही होईल. नोकरीत नवीन कामाची सुसंधी मिळेल. नवीन ओळखी होतील.

तूळ : घरात प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे करा. महिलांनी विनाकारण होणारी दगदग, धावपळ कमी करावी.

वृश्‍चिक : पैशाचे खर्च आटोक्‍यात ठेवावेत. अंधारात जास्त छोटा दिवा प्रकाशमान वाटतो तसा आनंद मिळेल.

धनु : व्यवसायात चूका दुरूस्त करून पुढे प्रगती करा. अनुभवातून शिकून शहाणे व्हा. शुभकार्ये ठरतील.

मकर : पैशाची थोडी चणचण भासेल तरी तूर्तास जवळीची पूंजी वापरा. नोकरीत आव्हाने स्विकारून काम कराल.

कुंभ : वरिष्ठ नवीन संधी देतील. लाभ घ्या. निडर स्वभावाचा फायदा होईल. कुटुंबासमवेत वेळ मजेत घालवाल.

मीन : मानसिक समाधान मिळेल. मुलांच्याकडून आनंदाची बातमी कळेल. सुटकेचा विेशास टाकाल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.