मुंबई – बॉलीवूडच्या हुशार अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी सोनाक्षी सिन्हा जेव्हाही पडद्यावर दिसली तेव्हा तिने चाहत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
View this post on Instagram
‘दबंग’ या तिच्या पहिल्या चित्रपटापासून आतापर्यंत प्रत्येक वेळी सोनाक्षी तिच्या चाहत्यांना एक नवीन आणि पूर्णपणे वेगळी शैली दाखवते. ‘डबल एक्सएल’ या चित्रपटानंतर सोनाक्षी पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी परतली आहे.
आपल्या पहिल्याच चित्रपटात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी सोनाक्षी आता शत्रूंशी लढण्यासाठी ‘दबंग’ भूमिकेत पडद्यावर आली आहे. सोनाक्षीच्या डेब्यू वेब सीरिज ‘दहाड’चा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीचा सेक्सी लूक दिसत आहे.
सोनाक्षीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिले, “ट्रेलर लाँच आज !!!” रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय, ‘दहाड’मध्ये सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, गुलशन देवय्या आणि सोहम शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही वेब सिरीज 12 मे पासून OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर स्ट्रीम करण्यासाठी सज्ज आहे.