खडकवासला – १८ जून रोजी वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजवणी गावच्या हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी एक बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृत देहाच्या शेजारी ओपो कंपनीचा मोबाईल फोन, काळ्या रंगाचा गॉगल तसेच कळ्या रंगाची बॅग व निळ्या रंगाचे जर्किन अशा वस्तू आढळून आल्या होत्या. त्यावर मृतदेहाची ओळख पटली असता मृतदेह दर्शना दत्तू पवार (वय २६ ) राहणार राजश्री शाहू बँक नरे पुणे हिचा असल्याचे निदर्शनास आले.
यासह दर्शना १२ जून रोजी १० वाजता सिंहगड किल्ला फिरण्यासाठी जाते असे सांगून निघून गेली होती. ती परत आली नव्हती त्यामुळे तिचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे दिनांक १५ जून रोजी मानव मिक्सिंग खबर दिली असल्याचे निष्पन्न झाले. मृत देहाचे शव विच्छेदानानंतर वेल्हे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे, यांनी तत्काळ गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करण्याकरता स्थानिक गुन्हे शाखा व वेल्हे पोलिसांची विशेष पथके तयार केली होती.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकास परिस्थिती जन्य पुरावे व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुधीर उर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे (वय २८) राहणार हिंगणे होम कॉलनी दत्त मंदिराजवळ कर्वेनगर पुणे मुळ राहणार मु .पो. शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या पुण्यातील मुख्य संशयित असल्याचे व तो गुन्हा घडल्यापासून पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून तपास पथकाने संशयित राहुल दत्तात्रय हंडोरे याचा शोध घेऊन अंधेरी रेल्वे स्टेशन येथून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबूल केले आहे. या गुन्ह्यातील आरोपीचा गुन्हा करण्यामागील मुख्य हेतू तसेच घटणेचा घटनाक्रम याबाबत तपास चालू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले हवेली विभाग हे करीत आहेत.
या गुन्ह्याचा तपास करण्याकरिता पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीकर सह पोलीस निरीक्षक राहुल गावडे ,प्रदीप चौधरी ,रामदास बाबर, हेमंत विरोळे, राजू मोमीन, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, तुषार भोईटे, मंगेश भगत ,दगडू विरकर, तसेच वेल्हे पोलीस स्टेशन येथील सह पोलीस निरीक्षक मनोज पवार, योगेश जाधव ,ज्ञानदीप दिवार, औदुंबर अडवाल ,राहुल काळे ,अजय शिंदे, आकाश पाटील ,गणेश चंदनशिव, ज्ञानेश्वर शेडगे, होमगार्ड विजय भोईने, विक्रांत गायकवाड, पोलीस मित्र संतोष पाटोळे यांची वेगवेगळी पथके तयार करून रवाना केलेली होती .त्यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.