वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली तालुका हवेली येथील विविध ठिकाणच्या रस्त्यांना पडलेले खड्डे मनपाच्या वतीने तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी केली होती.
वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांनी याकामी मदत करीत लोहगाव रस्ता, साई सत्यम पार्क परिसर, व इतर अशा 25 ठिकाणचे खड्डे बुजवल्याने वाघोलीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले की पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व गणेश मंडळांना दिलेल्या सूचनांचे पालन वाघोलीतील गणेश मंडळे करणार आहेत.
मात्र याच गणेश मंडळाच्या परिसरात वाघोली मध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीने विसर्जनासाठी ठिकठिकाणी सार्वजनिक हौद व विसर्जन मिरवणुकीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी वाघोली मधील अंतर्गत रस्त्यांना पडलेले खड्डे तातडीने दुरुस्त करून नागरिकांना व गणेश मंडळांना सहकार्य करण्याचे आवाहन रामभाऊ दाभाडे यांनी केले होते.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने विसर्जनासाठी प्रभावी नियोजन केले असून याबाबत पाहणी देखील वारंवार अधिकारी वर्गाकडून करण्यात आली असून रस्त्यांना पडणारे खड्डे जवळपास 25 ठिकाणी खड्डे दुरुस्त करून नागरिकांना दिलासा दिला आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे याकामी मनपाकडे पाठपुरावा केला होता त्यास यश आले असून नागरिकांनी रामभाऊ दाभाडे व पुणे मनपा प्रशासन यांचे आभार मानले आहेत.