सातारा – वस्तुनिष्ठ बातम्यांद्वारे गेल्या साडेचार वर्षात सातारा जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दैनिक प्रभातच्या सातारा आवृत्तीच्या शाखा व्यवस्थापकपदी एन. एस. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दैनिक प्रभातचे जनरल मॅनेजर बी. एल. स्वामी, वित्त व्यवस्थापक रवी इंडी, सातारा आवृत्तीचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पाटील यांनी सोमवारी पदभार स्वीकारला.
श्रीकांत कात्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. एन. एस. पाटील यांनी 1986 मध्ये वृत्तपत्र क्षेत्रात कामास आरंभ केला. गेल्या 36 वर्षांमध्ये वेगवेगळ्या दैनिकांमध्ये त्यांनी व्यवस्थापक पदांवर यशस्वीरित्या काम केले आहे. त्यांच्या प्रशासन, वितरण आणि जाहिरात या तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी त्यांच्या कार्यशैलीने वेगळे मापदंड निर्माण केले. दरम्यान, गेल्या साडेचार वर्षात दैनिक प्रभातने वेगवेगळ्या माध्यमातून आणि वार्तांकनाद्वारे सातारा जिल्ह्यात जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अंकवाढ, व्यवसायवृद्धी तसेच सातारा आवृत्ती नव्या उंचीवर नेण्यासाठी आपण सामूहिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही एन. एस. पाटील यांनी दिली.