सातारा: खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जनार्दन कृष्णाजी मुळे ऊर्फ जे. के. मुळे (वय८६) यांचे आज सातारा येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.
मूळचे पुसेगाव येथील रहिवासी असणारे प्राचार्य मुळे यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. ते रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक होते. नंतर २६ वर्षे त्यांनी प्राचार्यपदाची जबाबदारी पेलली. त्यांनी निवृत्तीनंतर पुसेगाव येथे लघु उद्योग सुरु केला होता.
शेतीमध्ये विविध प्रयोग केले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा शैलेश, सून सुजाता, सौ. लीना व डॉ. सौ. अंजली या दोन विवाहित मुली व नातवंडे असा परिवार आहे. पुसेगाव येथील स्मशानभूमीत रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.