Lok Sabha Election 2024 । ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आज सातारा दाै-यावर आले आहेत. आज साताऱ्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत पवार यांची बैठक सुरु आहे. या बैठकी पूर्वी अजित पवार गटाचे नेते नेते माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
साताऱ्यात लोकसभा मतदार संघातून महायुतीने भाजप नेते उदयनराजे भोसले यांना तिकीट दिले आहे. तर मविआकडून अद्यापही उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. अशात या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील यांच्यापेक्षा आमदार बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी बहुतांश कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी खूद्द खासदार शरद पवार यांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह आजही धरला आहे.
तर श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलीय. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आलीय.अशातच आज झालेल्या बैठकीत शरद पवार यांची पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी महत्त्वाची चर्चा सुरु आहे.
हे वाचलं का ? संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी; नेमकं काय घडले ?