Congress Income Tax Notice। काँग्रेसच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने पुनर्मूल्यांकन प्रक्रियेविरुद्ध पक्षाची याचिका फेटाळल्यानंतर काही तासांतच आयकर विभागाने पक्षालाएक नोटीस बजावलीय. विभागाकडून तब्बल १७०० कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आलीय. याची माहिती काँग्रेस नेते विवेक तनखा यांनी दिली.
काँग्रेस पक्षाला ही नोटीस मूल्यांकन वर्ष 2017-18 आणि 2020-21 साठी देण्यात आली आहे. त्यात दंड आणि व्याज देखील समाविष्ट आहे. याआधी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने पक्षाला दणका दिला होता. कर अधिकाऱ्यांनी चार वर्षांच्या कालावधीसाठी त्यांच्याविरुद्ध कर पुनर्मूल्यांकनाची कार्यवाही सुरू केल्याला आव्हान देणाऱ्या काँग्रेसच्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या.
काँग्रेसच्या खात्यांमध्ये अनेक बेहिशेबी व्यवहार Congress Income Tax Notice।
काँग्रेसच्या खात्यांमध्ये अनेक बेहिशेबी व्यवहार झाल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले. प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडे त्यांच्या पुनर्मूल्यांकनाची कार्यवाही सुरू करण्यासाठी पुरेसे आणि ठोस पुरावे होते. त्याआधारे कारवाई सुरू करण्यात आली. सध्याचे प्रकरण 2017 ते 2021 पर्यंतचे मूल्यांकन वर्ष आहे.
किंबहुना, काँग्रेस पक्षाने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमध्ये आयकर विभागाच्या 2014-15, 16 आणि 17 या वर्षांच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेलाही आव्हान देण्यात आले होते. यामध्ये, प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की, पक्षाचे अवशिष्ट उत्पन्न 520 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे दाखवण्यासाठी रेकॉर्डवरील साहित्य पुरेसे आहे.
न्यायालयाने याचिका फेटाळली Congress Income Tax Notice।
दिल्ली हायकोर्टाने यापूर्वी आयकर विभागाच्या तीन वर्षांच्या कर पुनर्मूल्यांकन प्रक्रियेविरोधातील याचिका फेटाळली होती. पुनर्मूल्यांकनाच्या कारवाईला काँग्रेसने विरोध केला होता. काँग्रेसचे वकील अभिषेक सिंघवी म्हणाले होते की कर पुनर्मूल्यांकन कारवाईसाठी ही कालमर्यादा लागू होते. आयकर विभाग जास्तीत जास्त सहा वर्षांसाठीच मूल्यांकन करू शकतो. प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींच्या विरोधात पुनर्मूल्यांकनाची कार्यवाही केली जात आहे.