मंचर – आंबेगाव तालुक्यात करोनाबाधितांची झपाट्याने वाढ होत असून बाधितांची संख्या 365 वर पोहोचली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी गुरुवारी (दि. 6) सकाळी दिली. दरम्यान, बुधवारी या एकाच दिवशी 19 बाधित रुग्णांची वाढ झाली आहे.
खडकी, एकलहरे, कानसे, निघोटवाडी, मंचर येथे प्रत्येकी 1, चास येथे 4, शिनोली येथे 5, घोडेगांव येथे 5, असे एकूण 19 रुग्ण बुधवारी (दि. 5) एकाच दिवसात आढळून आले आहेत. तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 365 झाली असून 240 रुग्ण बरे झाले आहेत. मृत झालेले रुग्ण सात असून 118 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे.