#dabangg 3 : ‘हुड हुड दबंग दबंग’ टायटल सॉन्ग वादाच्या भोवऱ्यात

मुंबई – ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी, दबंग 3 चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलर मध्ये सलमान खान आणि सई मांजरेकर यांची जोरदार केमेस्ट्री दिसून येत आहे. त्यामुळे दबंग 3 चित्रपट प्रेक्षकांसाठी उत्तम मेजवानी ठरणार आहे.

यातच मिळालेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचे ‘हुड हुड दबंग दबंग’ हे टायटल सॉन्ग हिंदूच्या भावना दुखावणारे असल्याचा हिंदू जनजागृती समितीचा आरोप आहे. या समितीचे महाराष्ट्र व झारखंडचे आयोजक सुनील घंवात यांनी या गाण्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

या गाण्यात काही ऋषी सलमानसोबत आक्षेपार्हपद्धतीने डान्स करताना दिसतात. हे सगळे हिंदूंच्या भावना दुखावणारे असल्याचे सुनील घंवात यांनी म्हटले आहे. ऋषीमुनींच्या जागी मौलवी आणि फादर-बिशप यांना नाचताना दाखवण्याची हिंमत मेकर्स करतील का? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, चित्रपटात कन्नड अभिनेता सुदीप खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दबंग 3 मध्ये सलमान खान आणि सुदीप यांचे जोरदार ऍक्‍शन सीन प्रेक्षकांना दिसणार आहेत. येत्या 20 डिसेंबरला दबंग 3 चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.