बर्मिंगहॅम – भारतीय जलतरणपटू श्रीहरी नटराजने शुक्रवारी येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात 54.68 सेकंदांची वेळ नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. बेंगळुरूचा 21 वर्षीय जलतरणपटू पाचव्या क्रमांकावर होता. त्याने 53.77 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली.
या प्रकारात दक्षिण आफ्रिकेचा जलतरणपटू पीटर कोएत्झेने 53.91ची वेळ नोंदवत अव्वल स्थान मिळविले. दुसरीकडे अनुभवी साजन प्रकाश आणि नवोदित कुशाग्र रावत हे उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरले.
प्रकाशने पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लाय स्पर्धेत 25.01 वेळेसह आठवे स्थान पटकावले. कुशाग्रने पुरुषांच्या 400 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत शेवटचे स्थान पटकावले. दरम्यान, प्रकाश पुरुषांच्या 100 मीटर आणि 200 मीटर बटरफ्लायमध्ये आपले आव्हान सादर करेल, तर कुशाग्र पुरुषांच्या 1500 मीटर फ्रीस्टाईल आणि 200 मीटर फ्रीस्टाईलमध्ये स्पर्धा करेल.