World Cup 2023 Pakistan vs Bangladesh Match : विश्वचषक 2023 स्पर्धेतील 31 वा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली, आणि पहिल्याच षटकात संघाला धक्का बसला.
पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने बांगलादेश संघाचा सलामीवीर तनजीदला एलबीडब्ल्यू (LBW) आऊट केले. आणि त्याच्या 51व्या वनडेत 100वी विकेट घेतली. त्यामुळे तो सर्वात जलद हा टप्पा गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला. शाहीन आफ्रिदीने मिचेल स्टार्कचा विश्वविक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर यापूर्वी (52 सामने) हा विक्रम होता.
तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ओव्हरआॅल (फिरकी आणि वेगवान) गोलंदाजामध्ये अशी कामगिरी करणारा आफ्रिदी तिसरा गोलंदाज ठरला आहे. या क्रमवारीत नेपाळचा लेगस्पिनर संदीप लामिछाने हा प्रथम क्रमांकावर आहे. त्यानं 41 व्या वनडेत 100 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तर यांनतर अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान 42 सामन्यात 44 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
🚨 RECORD ALERT 🚨@iShaheenAfridi becomes the fastest pacer to 1️⃣0️⃣0️⃣ ODI wickets in his 51st game! 🦅#PAKvBAN | #CWC23 | #DattKePakistani pic.twitter.com/ergzociYeu
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 31, 2023
डावाच्या पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने हा टप्पा गाठला. या क्रमवारीत मिचेल स्टार्कनंतर पाकिस्तानचा फिरकीपटू सकलेन मुश्ताक यांचा पाचवा क्रमांक लागतो. त्यानं 53 सामन्यात 100 बळी पूर्ण केले होते.
ODI Cricket : जलद 100 बळी घेणारे गोलंदाज
1. संदीप लामिछाने – 41 सामने
2. राशिद खान – 42 सामने
3. शाहीन आफ्रिदी- 51 सामने*
4. मिचेल स्टार्क – 52 सामने
5. सकलेन मुश्ताक – 53 सामने
6. शेन बॉन्ड – 54 सामने
7. मुस्तफिजुर रहमान – 54 सामने
8. ब्रेट ली – 55 सामने
शाहीनने 21 सप्टेंबर 2018 रोजी वनडेमध्ये पदार्पण केले होते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करताच अफगाणिस्तानविरुद्ध आपली प्रतिभा दाखवण्यास सुरुवात केली. त्याने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये 51 सामन्यांमध्ये 101 बळी घेतले आहेत, ज्यामध्ये त्याने 3 वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.