World Cup 2023 #INDvPAK Match Updates : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकातील महान सामन्यात दडपण हाताळण्याचा पुरेसा अनुभव टीम इंडियाला असेल. भारतीय संघात नऊ क्रिकेटपटू आहेत जे विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळले आहेत. 2015 आणि 2019 च्या विश्वचषकातील पाकिस्तानविरूध्द विजयाचे शिल्पकार दुसरे कोणी नसून विराट कोहलीविराट (2011 world cup : 9 धावा, 2015 world cup : 107 धावा, world cup 2019 : 77 धावा) आणि रोहित शर्मा आहेत. World cup 2015 मध्ये पाकविरूध्दच्या सामन्यात 107 धावा करणारा विराट सामनावीर ठरला होता, तर World cup 2019 मध्ये पाकविरूध्दच्या सामन्यात 140 धावा करणाऱ्या रोहितला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते.
We are here in Ahmedabad! 👋#CWC23 | #TeamIndia | #INDvPAK | #MeninBlue pic.twitter.com/dVuOaynYRN
— BCCI (@BCCI) October 12, 2023
विराटने विश्वचषक स्पर्धेत पाकविरुद्ध खेळले आहेत तीन सामने…
विराट कोहली(Virat Kohli) गेल्या तीन विश्वचषकांमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला आहे. त्याने 2011 च्या उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध नऊ धावा, आणि 2019 मध्ये 77 धावा केल्या होत्या. तर 2015 च्या विश्वचषकातील पाकविरूध्दच्या सामन्यात विराटने 107 धाव करत सामनाविराचा पुरस्कार पटकावला होता. सध्याच्या संघातील विराट आणि रोहित हे दोनच क्रिकेटपटू आहेत ज्यांनी विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध दोन किंवा अधिक सामने खेळले आहेत. रोहितने (Rohit Sharma) 2015 च्या विश्वचषक स्पर्धेतील पाकविरूध्दच्या सामन्यात 15 धावा केल्या होत्या.
शमीची 2015 च्या विश्वचषकात पाकविरोधात दमदार कामगिरी..
विराट-रोहित या दोघांशिवाय भारतीय संघात रवींद्र जडेजा (2015), रविचंद्रन अश्विन (2015), मोहम्मद शमी (2015), केएल राहुल (2019), हार्दिक पंड्या (2019), कुलदीप यादव (2019), जसप्रीत बुमराह (2019) हे देखील पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक सामने खेळले आहेत. 2015 वर्ल्डकपमध्ये पाकविरूध्दच्या सामन्यात शमीने 35 धावांत चार विकेट घेतल्या होत्या, तर केएल राहुलने 2019 मध्ये 57 धावा केल्या आणि रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. कुलदीपने 2019 वर्ल्डकप मध्ये 32 धावांत दोन बळी घेतले होत. यात त्याने बाबर आझमला क्लीन बोल्ड केले होते.
#CWC23 #INDvPAK : चाहत्यांसाठी वाईट बातमी! भारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट, मात्र….
पाकिस्तानचे पाच क्रिकेटपटू खेळले आहेत भारताविरुद्ध…
दरम्यान, कर्णधार बाबर आझमसह पाच पाकिस्तानी क्रिकेटपटूंना 2019 च्या विश्वचषकात भारताविरुद्ध खेळण्याचा अनुभव आहे. बाबर, फखर जमान, इमाम उल हक, शादाब खान आणि हसन अली हे ते 5 क्रिकेटपटू आहेत. 2019 च्या विश्वचषक (World cup 2019) सामन्यात भारताविरूध्दच्या सामन्यात #INDvPAK बाबरने 48 धावा आणि फखर जमानने 62 धावा केल्या होत्या. इमाम सात धावा करू शकला होता. हसन अली आणि शादाब खान चांगलेच महागात पडले. हसनने नऊ षटकांत 84 धावा दिल्या होत्या, तर शादाबने नऊ षटकांत 61 धावा दिल्या होत्या.