मुंबई :- अफगाणिस्तानकडून पराभवाचा धक्का बसल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने पुढील सर्व सामने आता आमच्यासाठी महत्वाचे आहेत, असे म्हटले आहे. आम्ही या पराभवाने निराश झालो असलो तरीही पुढील सर्व सामन्यात जास्त क्षमतेने व जबाबदारीने खेळ करत यशस्वी पुनरागमन करु, असा विश्वासही बटलरने व्यक्त केला.
दरम्यान, यंदाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत तुलनेने दुबळ्या असलेल्या अफगाणिस्तानने इंग्लंडचा 69 धावांनी पराभव करत सनसनाटी विजय मिळवला. मात्र, त्यामुळे इंग्लंडसमोरचे आव्हान आणखीनच बिकट बनले आहे. त्यांना आता उपांत्य फेरीत स्थान मिळवायचे असेल तर पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.
वर्ल्ड कप 2023 चा उत्साह आता वाढू लागला आहे. रविवारी झालेल्या रोमहर्षक लढतीत अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला. या विश्वचषकातील हा पहिलाच उलटफेर होता. हशमतुल्ला शाहिदीच्या संघाने 2015 नंतर एकदिवसीय विश्वचषकात पहिला विजय मिळवला. या पराभवामुळे इंग्लंडच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याच्या आशांना नक्कीच धक्का बसला आहे. तथापि, हे सांगणे खूप घाईचे आहे कारण संघाचे अद्याप सहा सामने बाकी आहेत आणि येथून जोस बटलरच्या संघाला सर्व सामने जिंकावे लागतील.
Los Angeles Olympics 2028 : 128 वर्षांची प्रतिक्षा संपली; अखेर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश #LosAngelesOlympics2028 #T20Cricket pic.twitter.com/Mga4gDM71t
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 16, 2023
त्याचवेळी अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर गुणतालिकेत इंग्लंडचा संघ पहिल्या चार संघांच्या यादीतून बाहेर पडला असून पाचव्या स्थानावर आला आहे. तीन सामन्यांत एक विजय आणि दोन पराभवांसह त्यांचे दोन गुण आहेत. अफगाणिस्तान संघाकडून पराभूत झाल्यानंतर इंग्लिश संघाचा नेट रनरेट आणखी घसरला आहे. इंग्लंडचा रनरेट -0.084 इतका झाला आहे.
अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवून या विश्वचषकात आपले विजयाचे खाते उघडले. त्यांच्याकडे तीन सामन्यांतून एक विजय आणि दोन पराभवांसह दोन गुण आहेत. अफगाणिस्तानचा संघ इंग्लंडच्या खालोखाल सहाव्या स्थानावर आहे. त्याचा नेट रन रेट -0.652 इतका आहे.