ICC ODI World Cup 2023 India vs South Africa : विश्वचषक 2023 च्या 37 व्या सामन्यात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुणतालिकेत भारत पहिल्या तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. आज जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहील.
कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.भारताने प्लेइंग-11 मध्ये एकही बदल केला नाही. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीच्या जागी फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीचा संघात समावेश केला.
IND Vs SA Live Score : भारताला 227 धावांवर तिसरा धक्का बसला. श्रेयस अय्यर 87 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 77 धावा करून बाद झाला. त्याला मार्करमच्या हाती एनगिडीने झेलबाद केले. श्रेयस आणि विराटमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी झाली.
7⃣7⃣ Runs
8⃣7⃣ Balls
7⃣ Fours
2⃣ SixesThat was one fine knock from Shreyas Iyer! 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/iastFYWeDi#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvSA pic.twitter.com/6oWFoYnJuD
— BCCI (@BCCI) November 5, 2023
सध्या 38.3 षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 235 धावा इतकी झाली आहे. सध्या विराट कोहली नाबाद 74*(90) आणि केएल राहुल नाबाद 2*(6) धावांवर क्रीजवर आहे.
भारताला दुसरा धक्का…
भारताला 11व्या षटकात 93 धावांवर दुसरा धक्का बसला. शुभमन गिल 24 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. त्याला केशव महाराज यानं क्लीन बोल्ड केले. ह्या आधी सहाव्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात रोहितने विकेट गमावली. रबाडाने त्याला टेंबा बावुमाकरवी झेलबाद केले. रोहितने 24 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 40 धावांची खेळी केली.
दरम्यान, विश्वचषकात दोन्ही संघ (IND Vs SA) पाच वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने दोन वेळा तर दक्षिण आफ्रिकेने तीन सामने जिंकले आहेत.