Team India tour of South Africa : भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-20 सामन्यांनंतर वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात तिन्ही फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार असतील. त्याचबरोबर या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरला टी-20 सामन्याने होणार आहे. यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 12 आणि 14 डिसेंबरला खेळवला जाईल.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणाऱ्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादव कर्णधार असेल. तर, केएल राहुल वनडे मालिकेत नेतृत्व करेल. तर कसोटी मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्मावर असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरू होईल. यानंतर दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येतील.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 17 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. जोहान्सबर्गच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. यानंतर मालिकेतील दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना अनुक्रमे 19 आणि 21 डिसेंबर रोजी खेळवला जाईल. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. मात्र यानंतर दोन्ही सामने सायंकाळी 4.30 वाजल्यापासून खेळवले जातील.
Ram Mandir : भारतीय क्रिकेट संघाच्या ‘या’ स्टार खेळाडूलाही मिळाले राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण,पण…..
टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे. सेंच्युरियन पहिल्या कसोटीचे आयोजन करेल. यानंतर मालिकेतील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे. हा कसोटी मालिका सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता खेळवला जाईल.
भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक…
टी-20 मालिका….
पहिला सामना – 10 डिसेंबर, डर्बन
दुसरा सामना – 12 डिसेंबर, केबेर्हा
तिसरा सामना – 14 डिसेंबर, जोहान्सबर्ग
एकदिवसीय मालिका…
पहिला सामना – 17 डिसेंबर, जोहान्सबर्ग
दुसरा सामना – 19 डिसेंबर, केबेर्हा
तिसरा सामना – 21 डिसेंबर, पार्ल
कसोटी मालिका…
पहिला सामना – 26 ते 30 डिसेंबर, सेंच्युरीयन
दुसरा सामना – 3 ते 7 जानेवारी, केपटाऊन
भारतीय चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत-दक्षिण आफ्रिका मालिका थेट पाहता येणार आहे. याशिवाय, तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल.