पुणे – सीमा शुल्क विभागाने एका ट्रकमधून तब्बल 412 किलो गांजा पकडला. नळदुर्ग-सोलापूर रस्त्यावर ही कारवाई केली आहे.
या गांजाची बाजारपेठेत 85 लाख रुपये किंमत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ट्रकमधून गांजाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने कारवाई केली.
वाहनामध्ये तपासणी केली असता 206 पिशव्यांमध्ये 412 किलो गांजा मिळून आला. पुण्याच्या सीमा शुल्क विभागाच्या सह आयुक्त वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.