तळघरात केला होता साठा
पुणे – कामशेत येथील पवनानगर येथे ग्रामीण पोलिसांनी एकाच्या घरातून तब्बल 86 लाख 77 हजार रुपयांचा गांजा पकडला. ही मागील काही दिवसांतील सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईने कामशेत परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी मोठा फौजफाटा घेत ही कारवाई केली. हा गांजा एका सराईत गुन्हेगाराच्या घरातमध्ये तळघरात ठेवण्यात आला होता.
संतोष रामचंद्र वाळुंज (रा.दौंडे कॉलनी, पवना नगर रोड,कामशेत ता.मावळ जि.पुणे) व धनाजी विठ्ठल जिटे (रा. ताजे, ता.मावळ, जि.पुणे सध्या रा. संतोष वाळुंज चाळ, पवनाचैक, पवनानगररोड, कामशेत, ता.मावळ, जि. पुणे) अशी सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. यातील संतोषच्या घरात हा साठा होता.
सहा. पोलीस अधीक्षक(लोणावळा) नवनीत कॉंवत यांना खबऱ्याकडून बातमी मिळाली की, संतोष वाळुंज हा त्याचे राहते घरात गांजा अंमली पदार्थाचा साठा बेकायदा बाळगुन आहे. त्यांनी तातडीने पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांचेशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामशेत पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व पोलीस कर्मचारी आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी तेथे छापा टाकला असता आरोपी संतोष रामचंद्र वाळुंज खबर लागताच पळून गेला तर त्याचा साथीदार धनाजी विठ्ठल जिटे हा सापडला . संतोष वाळुंज याचे राहते घराची घरझडती घेता बैठकीचे खोलीचे तळघरात 578.500 किलो गांजा मिळून आला. याची बाजारात एकुण किंमत रूपये 86 लाख 77 हजार 500 रूपये आहे. त्याचे विरूध्द एन.डी.पी.एस.कायदयान्वये कामशेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कारवाई सहा. पोलीस अधीक्षक (लोणावळा) नवनीत कॉंवत, पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा)पद्माकर घनवट, पोलिस निरीक्षक विठठल दबडे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, विजय पाटील, दत्तात्रय जगताप, हवालदार प्रकाश वाघमारे, अजय दरेकरल, महेंद्र वाळुंजकर, मुकुंद आयाचित, राजेंद्र पुणेकर, रउफ इनामदार, पोलिस नाईक, गणेश महाडीक पोलीस नाईक, संतोश शिंदे, संदीप शिंदे, पोलिस कॉन्टेबल हनुमंत माने, ए.डी.कवठेकर, एस.एस.डोईफोडे, संतोश शिंदे, एस.एम.वाडेकर, ए.व्ही.पवार, नामदेव खैरे, राम जगाताप, दत्तात्रय मोरे, दत्ता शिंदे, चालक पोलीस नाईक, सचिन गायकवाड, समाधान नाईकनवरे आणि श्वान राधा यांच्या पथकाने केली.