खळबळजनक ! 10 पैकी एकाला करोनाचा संसर्ग

जिनिव्हा – जगभरातील 10 पैकी एका व्यक्‍तीला करोना विषाणूची लागण झाली असावी, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला आहे. कोविड-19 संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या 34 सदस्यांच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये डॉ. मायकेल रेयान यांनी हा अंदाज वर्तवला.

ही संख्या ग्रामीण ते शहरी पातळीवर वेगवेगळी असू शकते. मात्र जगातील बहुतेक लोकसंख्येला या विषाणूचा धोका असल्याचेच यातून सिद्ध होते असेच चित्र असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याची जगाची लोकसंख्या 7.6 अब्ज इतकी आहे. त्यापैकी 760 दशलक्ष लोकांना करोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे. लागण झालेल्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या तेवढीच आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या रुग्णसंख्येमध्येही हीच आकडेवारी पुढे आली आहे, असे डॉ. रेयान म्हणाले. आता जगभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्‍यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.