‘सैरा नरसिंह रेड्डी’ चित्रपटातील तम्मनाचा लूक व्हायरल, शेअर केला व्हिडिओ

मुंबई – बहुप्रतिक्षित ‘सैरा नरसिंह रेड्डी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. ऐतिहासिक विषय असलेल्या या चित्रपटात आंध्रप्रेदशातील एका महान लढाऊ योद्ध्याची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अनेक कलाकारांची मांदियाळी पहायला मिळणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. तमन्नाने तिची झलक असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Here’s a glimpse of #Lakshmi

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

तमन्ना या चित्रपटात लक्ष्मी हे पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचं बजेटही २७० कोटीच्या आसपास आहे. यामध्ये भरपूर स्पेशल इफेक्ट्स, तंत्रज्ञान आणि व्हिएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटात भव्यदिव्यता पाहता येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणााऱ्या स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, चिरंजीवी यांच्यासोबत तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. शिवाय, यातील कलाकारांचे लूकही समोर आले होते.

सैरा नरसिंह रेड्डी’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. चिरंजीवी आणि अमिताभ बच्चन या दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. हा एक पिरिअड ड्रामा आहे. १८८० च्या काळातील आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्याची ही कथा आहे.

सुरेंद्र रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राम चरण या चित्रपटाचा निर्माता आहे. या चित्रपटाचे शूटींग गेली ३ वर्षे सुरू होते. हा एक बिग बजेट चित्रपट आहे. यातील फाईटच्या एका सीनसाठी तब्बल ४५ कोटी रुपये खर्च झाला आहे. यावरुन चित्रपटासाठी किती मेहनत घेतली गेली आहे याचा अंदाज येऊ शकतो. २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)