पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएआय) ने मे सत्रासाठी कंपनी सेक्रेटरीज एक्झिक्युटिव्ह प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही प्रवेश परीक्षा 8 मे 2021 रोजी होणार आहे. परीक्षा रिमोट प्रॉक्टर्ड मोडवर आयोजित केली जाणार आहे.
आपल्या घर बसल्या किंवा कोणत्याही सुविधाजनक ठिकाणाहून प्रवेश परीक्षा देण्याची परवानगी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. उमेदवार परीक्षेसाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कॉम्प्युटरचा उपयोग करू शकतात. त्यांना स्मार्टफोन (मोबाइल), टॅबलेट आदिंचा वापर करून परीक्षा देण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. दूरस्थ पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना हॉल तिकीट परीक्षेच्या तारखेच्या दहा दिवस आधी उपलब्ध होतील. त्याची सविस्तर अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
प्रवेश परीक्षेत 140 बहुपर्यायी प्रश्न असतील. एकूण 200 गुणांची परीक्षा असेल, यात प्रत्येकी 50 गुणांचे एकूण 4 पेपर असतील. बिझनेस कम्युनिकेशनचे 35 प्रश्न, लीगल अॅप्टीट्यूड अँड लॉजिकल रीजनिंगचे 35 प्रश्न, इकॉनॉमिक अँड बिजनेस एनवायर्नमेंटचे 35 प्रश्न आणि करंट अफेयर्सचे 15 प्रश्न आणि प्रेझेंटेशन अँड कम्युनिकेशन स्किलचे 20 प्रश्न असतील. परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण दोन तासांचा वेळ दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.