पिंपरी, (प्रतिनिधी) – चर्होली येथील वागेश्वर महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित केलेली बैलगाडा शर्यत व कुस्ती आखाड्याला पंचक्रोशीतून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त चर्होलीतील वाघेश्वर महाराजांचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवामध्ये सलग तीन दिवस विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवारी (दि.9) सकाळपासून वाघेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी बै़लगाडा शर्यतीला परिसरातील बैलगाड्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. रविवारी (दि.10) निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. तर सोमवारी (दि.11) पुन्हा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.