भिगवण, (वार्ताहर) – मदनवाडी (ता. इंदापूर) येथील हॉटेल आनंदवर भिगवण पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय सुरू असल्याप्रकरणी हॉटेल मालक व चालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हॉटेलमालक नामदेव बाळासो बंडगर, अमित तानाजी भाकरे (दोघे रा. मदनवाडी), रोहित अंकुश निकम (रा. उद्धट), गजानन लक्ष्मण ठाकूर (रा. आनंद हॉटेल), मुंगाजी उर्फ पिंटू आवरगड (रा. भिगवण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मदनवाडी हद्दीतील हॉटेल आनंद येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक व भिगवन पोलिसांना मिळाली होती त्याच्या आधारे संबंधित हॉटेलवर छापा टाकला असता त्या ठिकाणी तीन महिला आढळून आल्या व चौकशीअंती वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे आढळले.
त्यानुसार स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड, सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर, रंजीत मुळीक, दत्तू जाधव, युवराज घोडके, अंकुश माने, सारिका जाधव, आप्पा दराडे यांच्या पथकाने केली.