समालोचक हर्षा भोगलेंची टीका

लंडन – जर तुम्ही चांगली फलंदाजी व गोलंदाजी करत असाल, तर भारतीय संघात जागा आहे, अर्ज करा, संधीही मिळेल, अशा शब्दांत प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी भारतीय संघावर टीका केली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताला 2-1 असा पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या खेळाडूंनी निराशा केली.

अखेरच्या सामन्यात तर तळात फलंदाजी करत कुलदीप यादव या मुख्य गोलंदाजाने प्रमुख फलंदाजांपेक्षा जास्त धावा केल्या.

यावरूनच भोगले यांनी भारताच्या नवोदित खेळाडूंवर टीका केली आहे. तसेच देशातील ज्या खेळाडूंना उपयुक्‍त फलंदाजी व गोलंदाजी येते, त्यांनी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अर्ज करावा, अशा शब्दांत खिल्लीही उडवली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.