लिस्बन :- स्लोव्हाकिया आणि लक्झेंबर्ग विरुद्ध आगामी युरो 2024 पात्रता फेरीसाठी शनिवारी घोषीत करण्यात आलेल्या पोर्तुगालच्या संघात स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोची निवड करण्यात आली. माजी युरोपियन चॅम्पियन पोर्तुगाल पुढील वर्षी जर्मनीत होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्रता गट “ग’ मध्ये अव्वल स्थानावर आहे.
पुढील शुक्रवारी ब्रातिस्लाव्हा येथे स्लोव्हाकियाचे आव्हान मोडीत काढल्यानंतर लगेच तीन दिवसांनंतर पोर्तूगाल लक्झेंबर्गशी भिडणार आहे. आतापर्यंत चार पात्रता सामन्यांमध्ये पाच गोल करणाऱ्या रोनाल्डोचे पोर्तुगाल प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ कौतुक केले आहे.
ते म्हणाले, “200 सामने खेळणारा अनुभवी खेळाडू आपल्या संघात परतणे ही अर्थातच आमसाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पुनरागमनामुळे मी खूप आनंदी आहे.’
सौदी अरेबियामध्ये सध्या आपल्या व्यवसायात लक्ष घातलेल्या 38 वर्षीय रोनाल्डोने जूनमध्ये पोर्तुगालसाठी आपला 200वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या सामन्यात पोर्तूगालने शेवटच्या वेळी आइसलॅंडवर 1-0 असा विजय मिळवला होता. रोनाल्डोसह मिडफिल्डर ओटावियो आणि रुबेन नेव्हसचाही संघात समावेश करण्यात आला आहे.