पुणे – नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गावठी पिस्तूलासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनीट सहाने अटक केले. मयूर भाऊसाहेब गायकवाड (25, रा. चिखली, जाधववाडी) आणि ओंकार ऊर्फ विकी प्रकाश नाळे (28, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघेही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सराईत आहेत.
दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूलासह काडतुसे बाळगणारे सराईत वाघोलीतील सुयोगनगरमध्ये येणार असल्याची माहिती पोलीस नाईक नितीन मुंढे आणि नितीन शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी नागरिकांमध्ये दहशत राहण्याच्या हेतूने पिस्तूल व काडतुसे बाळगल्याची कबुली दिली. दोघेही आरोपी मनोज साळवे टोळीतील आहेत.