पुणे – ज्येष्ठ नागरिकास हत्याराचा धाक दाखवुन लटणाऱ्या सराईत गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीतील 900 रुपये, पाकिट व कोयता हस्तगत करण्यात आला आहे. शंकर ऊर्फ मोहन नामदेव सरवदे, 21, रा. भिलारेवाडी, कात्रज) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दि.14 जून चे सुमारास कात्रज कोंढवा रस्त्यावर ज्येष्ठ नागरीक संजय दशरथ शेडगे( कात्रज) हे त्यांचे दुचाकी गाडीवरुन गोकुळनगर येथे जात होते. त्यांचे मागुन दुचाकीवरुन आलेल्या सरवदे व त्याच्या साथीदाराने आमचे गाडीला धडक का दिली ? असा बहाणा करुन थांबवले.
यानंतर कोयत्यासारखे लांबडे धारदार हत्यार गळयाला लावुन खिशातील सर्व पैसे दे नाहीतर जिवे ठार मारतो अशी धमकी दिली. त्यांना मारहाण करुन जबदरस्तीने त्यांचे खिशात हात घालुन त्यांचे पाकिट व त्यातील रोख 1900 रुपये, ड्रायव्हींग लायसन्स जबरदस्तीने काढुन घेतले.
त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांना व दुकानदारांना आरोपींनी हत्याराचा धाक दाखवून दमदाटी दहशत केली. लोक घाबरुन दुकाने बंद करुन पळुन गेले. त्याबाबत संजय शेडगे यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपींचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार सचिन पवार व गणेश शेंडे यांना सदरचा गुन्हा सरवदे व त्याचा साथीदार ओंकार मारणे यांनी केला असुन सरवदे हा त्याचे गावी पळुन जाण्याचे प्रयत्नात असुन तो मागंडेवाडी फाटयाजवळ थांबला असल्याची खबर मिळाली होती. सरवदे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी खुनाचा, बेकायदा पिस्टल जवळ बाळगल्याचा व इतरही गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, प्रकाश पासलकर यांचे मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, सर्फराज देशमुख, सचिन पवार, गणेश शेंडे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड, योगेश सुळ व सचिन गाडे यांनी केली आहे.