पुणे : कोरोनाच्या काळामध्ये हॉटेल व्यवसायिकांची खूप मोठ्या प्रमाणात ससेहोलपट झाली होती.कोरोनाच्या काळात सर्वात जास्त नुकसान हॉटेल व्यवसायिकांचे झाले होते. त्याच बरोबर हॉटेल व्यवसायिकांनी सामान्य नागरिकांना त्या कठीण काळात मदत केली. कोरोनाच्या काळात हॉटेल व्यावसायिकांवर आंदोलनामुळे दाखल करण्यात आलेले गुन्हे मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना समक्ष भेटून माघारी घ्यायची विनंती करणार असल्याचे आश्वासन माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
हॉटेल व्यवसायिकांना एकत्र करणारी युनायटेड हॉस्पिलिटी असोसिएशनची पहिली वार्षिक बैठक पुण्यात नुकतीच पार पडली. या बैठकीची सुरुवात दीपप्रज्वलन मा. महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योजक फत्तेचंद रांका, महेंद्र पितालिया, असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नारंग, उपाध्यक्ष अॅड. अजिंक्य शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.असोसिएशनचे सचिव दर्शन रावल, खजिनदार समीर शेट्टी, माहुवा नारायण, राहुल रामनाथ, अॅड. अजिंक्य उडाने आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सुप्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. व वायू ऍपचे उदघाटन केले
उद्योजक फत्तेचंद रांका म्हणाले की कोरोनाच्या काळानंतर हॉटेल व्यवसायिकांची पहिली बैठक उत्साहात पार पडली. यामध्ये भविष्यात मोठमोठी आव्हाने हॉटेल व्यवसायिकांवर येथील मात्र हॉटेल व्यवसायिकांनी घाबरून न जाता खंबीरपणे पाय घट्ट रोवून उभे राहिले पाहिजे. त्याच बरोबर हॉटेल व्यवसायिकांनी त्यांची एकी कायम ठेवली पाहिजे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष या नात्याने मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.
युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नारंग म्हणाले की, ही संस्था आम्ही दोन वर्षांपूर्वी पाच लोकांनी सुरू केली होती. आत्ता या संस्थेमध्ये 700 पेक्षा जास्त सदस्य आहेत. तर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये पुणे, महाराष्ट्र आणि भारतातून दोनशेहून जास्त सदस्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच हॉटेल व्यवसायिकांना त्यावर इतंभूत माहिती मिळेल. आम्ही याच बरोबर आपत्तीकालीन निधी उभारणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनल पाटील यांनी केले .