यवत – केडगाव (ता.दौंड) येथे दोन व्यक्तीवर धारदार शास्त्राने वार केल्याची घटना मंगळवार दि.११ रोजी केडगाव येथील आयुष रेसिडेन्सी जगताप वस्ती येथे घडली आहे. यामध्ये दोघावर धारदार शस्त्राने वार केले. दोघेजण गंभीर जखमी असून, त्यांच्या हातावर, डोक्याला गंभीर जखमा झाली आहे.
राहुल बाबुराव गायकवाड, हर्षद बाळासो गायकवाड दोघेही रा. केडगाव आयुष रेसिडेन्सी जगताप वस्ती अशी जखमींची नावे आहेत. या दोघांवर हल्ला करून आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी दोघांवर अंदाजे चार ते पाच जणांनी धारदार शास्त्राने हल्ला केला गेला असल्याची शक्यता वर्तविली जात असून त्यांच्यामध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
मंगळवार (दि.११) सायंकाळी सहा साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. आरोपी हल्ला करून फरार झाले असून यवत पोलीस त्यांचा तपास करत आहेत. जखमीना केडगाव येथील मोहन हॉस्पिटल येथे दाखल केले.त्याना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवीले असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे,पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोखंडे, कापरे यांनी भेटू दिली असून पुढील तपास यवत पोलीस करत आहेत