खडकवासला – डोणजे तालुका हवेली ते १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे .याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोनच दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोन आरोपींना या गुन्ह्यातही सहभाग आहे.
निलेश नेटके वय २१, लक्ष्मण पाटील वय २२, व इतर तीन अल्पवयीन सर्व राहणार डोणजे तालुका हवेली जिल्हा पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची आरोपींची नावे असून यातील निलेश नेटके हा अटक असून लक्ष्मण पाटील फरार झाला आहे. दोन दिवसात दोन वेळा बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने डोणजे परिसरातील पालक व शिक्षकांनी चिंता व्यक्त केली आहे.
हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून त्याचे व्हिडिओ तयार केले. घडलेल्या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली घाबरलेल्या मुलीला व तिच्या आईला महिला पोलिस अधिकाऱ्यांनी विश्वासात घेतल्या नंतर पीडित मुलीने याबाबत माहिती दिली.
त्यानुसार हवेली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील व हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम अधिक तपास करीत आहेत