मुंबई – भारताने जिंकलेल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारलेला ’83’ सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा सिनेमा माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जीवनावर आधारित असून, सिनेमात 25 जून 1983 च्या विश्वचषक स्पर्धेतील घटना दाखविण्यात आली आहे.
1983 मध्ये भारतानं 2 वेळा विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिजचा 43 धावांनी पराभव करून प्रथमच विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं. यावेळी भारताच्या विजयावर कोणाचाही विश्वास नव्हता. पण, भारताच्या त्या ऐतिहासिक विजयानं जागतिक क्रिकेटमध्ये भारताची ओळख तर झालीच, पण त्या विजयानंतर भारतीय क्रिकेटचं नवे पर्व सुरू झालं. आणि याच संपूर्ण घटनेवर हा सिनेमा आधारित आहे.
सध्या सगळीकडेच ’83’ सिनेमाचा बोलबाला असून, सर्वच सेलिब्रिटींनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. तसेच सिनेमात कपिल देव यांची मुख्य भूमिका साकारणार अभिनेता ‘रणवीर सिंह’ याचं ही तितकंच कौतुक होताना दिसत आहे.
Couldn’t have relived the most iconic moment of Indian cricket history in a better manner. A fantastically made movie which immerses you in the events and the emotion of the world cup in 1983. Splendid performances as well.
— Virat Kohli (@imVkohli) December 25, 2021
’83’ सिनेमा पाहिल्यानंतर विराट कोहलीनं ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी तो अतिशय भावुक झाला होता. “भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्षण यापेक्षा चांगलाप्रकारे अनुभवता आला नसता. एका सिनेमाच्या माध्यमातून 1983 च्या विश्वचषक स्पर्धेतील घटना आपल्याला पुन्हा अनुभवता येतेय, हे आमचं भाग्य आहे.” असं विराट म्हणाला.
“83′ सिनेमात रणवीर सिंह माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत दिसला आहे. तसेच दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्याही मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे, दीपिका या चित्रपटाची सहनिर्मातीही आहे.