बनावट नाणी बनविणाऱ्या कारखान्यावर धाड

चंदीगड -हरियाणातील बहादूरगंजमध्ये 5 रुपयांची बनावट नाणी बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. यावेळी कारखान्यातील नाणी बनविण्याची मशीन, बनावट नाणी, त्यासाठी लागणारा कच्चा माल आणि पोलाद जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी 4 युवक आणि एका महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांची नाणी जप्त करण्यात आली आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here