पुणे – दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून तरुणाचा मोबाईल हिसकावणार्याला मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली. बापू बुवाजी शिंदे (वय.30,रा.शिरुर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी सागर लोंढे (वय.27,रा.मार्केटयार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिंदे याच्या विरुद्ध मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास मार्केट यार्डातील भाजीमार्केट जवळ घडली.
फिर्यादी तरुण लोंढे हा जेवन झाल्यानंतर मोबाईलवर गेम खेळत थांबला होता. त्यावेळी शिंदे याने त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र लोंढे याने त्याला नकार दिला. त्यातूनच शिंदे याने लोंढेच्या हातातील 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.