पुणे- सराईत गुन्हेगार नितीन म्हस्के याच्या खून प्रकरणी गुन्हे शाखेकडून संयुक्त कारवाई करत 48 तासांत 17 गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यातील दहा आरोपी कर्नाटकातून, दोन आरोपी केशवनगर येथून, एक आरोपी खडकवासला येथून आणि चार आरोपींना खराडी परिसरातून अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मंगळवारी रात्री नितीन म्हस्के (35, रा.ताडीवाला रोड) हा त्याच्या मित्रांसोबत गदर टु सिनेमा बघायला गेला होता. रात्री सव्वा एकच्या सुमारास दुचाकीवर पाठीमागे बसून जात असताना दुचाकी खाली पाडून नितीन म्हस्के याच्यावर हल्ला करुन ठार मारले होते. त्याच्यावर एकूण 17 आरोपींनी धारदार शस्त्राने वार केल्याने शरीराची चाळण झाली होती. या घटनेनंतर म्हस्के याचे नातेवाईक आणि मित्र मंडळींनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या ठोकत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेची सहा पथके तयार केली होती. तांत्रीक विश्लेषण आणि खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनूसार आरोपी मुख्य आरोपी सागर उर्फ यल्ल्या हा त्याच्या साथीदारांसह लातुर, सोलापुर, कोल्हापुर, पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि कर्नाटक येथील रायपुर व बेळगाव येथे लपल्याचे समजले. त्यानूसार गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या पथकाने सागर उर्फ यल्या ईराप्पा कोळनट्टी (35) ,सुशिल अच्युतराव सुर्यवंशी( 27), शशांक उर्फ वृषभ संतोष बेंगळे(21), गुडगप्पा, फकीरप्प गाभराई(28) आणि एक अल्पवयीन मुलगा(सर्व रा. ताडीवाला रोड) यांना रायचुर ता. बेळगाव येथील दुर्गम भागातून अटक केली. तर मलेश उर्फ मल्लया शिवराज कोळी (24), किशोर संभाजी पात्रे( 20), साहिल उर्फ सल्लया मनोहर कांबळे (20), गणेश शिवाजी चौधरी (24, रा.कुंजीरवाडी), रोहित बालाजी बंडगर(20, सर्व रा.ताडीवाल यांना विश्रांतवाडी, पुणे शहर, चौफुला परिसरातून अटक केली.
युनट एकच्या पथकाने मुख्य आरोपीसह दहा जणांना अटक केली. खंडणी विरोधी पथक एककडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या पथकाने केशवनगर, मुंढवा परिसरातून विवेक उर्फ भोला भोलेनाथ नवघरे (25,रा.रामवाडी), इम्राद हमीद शेख(31,रा.केशवनगर) या दोघांना अटक केली. दरोडा व वाहन विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या पथकाने आकाश उर्फ चड्डी सुनिल गायकवाड( 22,रा.उत्तमनगर) याला अटक केली. तर गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या पथकाने खराडी आणि कल्याणीनगर भागातून लॉरेन्स राजू पिल्ले (36), मनोज उर्फ बाबा विकास हावळे(23), रोहन उर्फ मच्छी रमेश तुपघर (23) , विकी उर्फ नेप्या काशीनाथ कांबळे (22,सर्व रा.ताडीवाला रोड) यांना अटक केली. या आरोपींकडून चार दुचाकी आणि चार मोबाईल हॅण्डसेट असा अडीच लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. या सतराही आरोपींना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील दहा आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.