पुणे – रोहित शर्माच्या क्रिककींगडम क्रिकेट अकादमी यांच्या वतीने आयोजित क्रिककींगडम चॅम्पियन्स करंडक १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत २२ यार्डस संघाने दुसरा विजय मिळवला.
सहारा क्रिकेट मैदान, व्हिजडम क्रिकेट मैदान व वीरांगना क्रिकेट मैदनावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सत्यजीत दगडे (३-१३) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर २२ यार्डस संघाने पृथ्वी सेंच्युरियन्स संघाचा ३ गडी राखून पराभव केला.
दुसऱ्या सामन्यात प्रणव हडवे (११२ धावा) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर क्रिशू नाईटस संघाने काँटिनेंटल सुपर किंग्जचा २३ धावांनी पराभव केला. अन्य लढतीत सतीश राठोड (२१ व १-११) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एसपीजी स्पार्टन्स संघाने सहारा क्रीककींगडम संघावर ९५ धावांनी विजय मिळवला. पार्थ मनहस (३-१८) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर सिंगापूर स्ट्रायकर्स संघाने ओडीएम ब्लास्टर्स संघाचा ८ गडी राखून पराभव केला.