पुणे – पुण्यातील बॉम्बे सॅपर्स वॉर मेमोरियल २०२४ मध्ये त्यांचे शताब्दी वर्ष साजरी करत आहे. या प्रतिष्ठित स्मारकाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने रविवार, १४ जानेवारी २०२४ रोजी बीईजी केंद्र, दिघी हिल्स, पुणे येथे फिटिस्तान -एक-भारत मॅरेथॉन आयोजित ‘बॉम्बे सॅपर्स सोल्जरथॉन’ चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख रविवार, ३१ डिसेंबर आहे.
सहभागी रनर्ससाठी ही एक अनोखी शर्यत असेल. त्यांना दिघी हिल्स येथील बीईजी सेंटरमध्ये सैनिकांसोबत धावण्याचा दुर्मीळ संधी मिळेल. धावपटूंचा संपूर्ण मार्ग सॉफ्ट रस्त्याचा असेल . हा मार्ग बीईजी कॅम्पसच्या आतील हिरव्यागार दिघी टेकड्या आणि गुरनाम तलावाच्या परिसरातून जाईल. या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी मऊ रनिंग रूट्सवर धावतील.
बहुतेक रस्त्यावर धावणाऱ्या मॅरेथॉनपेक्षा हे पूर्णपणे वेगळे असेल, ज्यामुळे तुमच्या गुडघा/ घोट्याच्या सांध्यावर जास्त ताण येऊ शकतो. पुणे/मुंबई शहराच्या वातावरणात धावण्यासाठी असे सॉफ्ट मार्ग उपलब्ध नाहीत. मॅरेथॉनचा आणखी एक पैलू म्हणजे ती सर्व नागरिकांसाठी खुली आहे आणि सर्व स्तरातील लोकांना आपल्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून धावण्याची आणि लष्करी जीवनशैलीचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करेल. हाफ मॅरेथॉन, 10 किमी आणि 5 किमी मॅरेथॉनचा मार्ग गुरनाम तलावाभोवती आणि बीईजी सेंटर, दिघी हिल्स, पुणेच्या आसपासच्या जंगलातील पायवाटेचा आहे.
Mumbai Marathon 2024 : केटी मून मुंबई मॅरेथॉनची अँम्बेसेडर….
शर्यतीची गटवारी
– १८ वर्षे आणि त्याहून अधिक – २१ किमी (वेळेनुसार धावणे).
– १४ वर्षे आणि त्याहून अधिक – १० किमी (वेळेनुसार धावणे).
– १० वर्षे आणि त्याहून अधिक – ५किमी (वेळेनुसार धावणे).