गगनभरारी अकॅडमी या स्पर्धा परीक्षा संस्थेची स्थापना 14 ऑगस्ट 2016 रोजी राजगुरूनगर (ता. खेड) या शहरात झाली. सुरुवातीच्या काळात संघर्ष मोठा होता. खेड्या-पाड्यात, वाड्या-वस्त्यांवर डोंगराळ दुर्गम भागात फिरून आदिवासी समाजच्या मुलांना सुरुवातीला प्रशिक्षणाद्वारे प्रकाश झोतात आणले. त्या विद्यार्थ्यांकडून एक रुपयाही न घेता त्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण दिले. आज ते विद्यार्थी-प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम बजावत आहेत. “”श्रद्धेच्या माध्यमातून आजवर म्हणजे 4 ते 5 वर्षांत हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत व त्यातील बरेचसे विद्यार्थी अधिकारी म्हणून देशाची सेवा करत आहेत. ही गगनभरारी अकॅडमीसाठी अभिमानाची बाब आहे.
या संस्थेच्या स्थापनेत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्यांनी ही संस्था उभी केली, नावारूपाला आणली ते या संस्थेचे सर्वेसर्वा प्रा. अशोक वंजारे यांनी अतिशय मेहनत घेऊन, मोठ्या हिमतीने ही संस्था उभी केली. गगनभरारी अकॅडमीच्या माध्यमातून “उत्तम दर्जा’चे प्रशिक्षण दिले जाते. तसेच येथे शिकवण्यासाठी तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकवृंद असून अधिकारी वर्गाचे देखील येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत असते. या संस्थेवर जीवापाड प्रेम करणारा अधिकारी वर्ग देश सेवेसाठी तयार झाला आहे. यामध्ये तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय पोलीस अधिकारी, गजानन टोम्पे साहेब, प्रसिद्ध लेखक राजेश भराटे सर, देवा जाधवर सर, तसेच आमचे मित्र एपीआय पप्पू गोरावडे, अर्जुन कुदळे, सुदाम सिरसाठ, श्रीराम पडवळ, मुन्ना चऱ्हाड या सर्व अधिकारी वर्गाचे वारंवार मार्गदर्शन गगनभरारी ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळत असते. तसेच रझ्झाक शेख, संपत गारगोटे, अनिल बारणे, कैलास केदारी यांचे सहकार्य लाभत आहे. देश सेवा बजवण्याचा वसा घेणारे अधिकारी घडवण्यासाठी अकॅडमीचे कामकाज सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अखंडित सुरू असते. या कालावधीत विद्यार्थ्यांचा मैदानी सराव तसेच गणित/बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांचे धडे वेळापत्रकानुसार गिरवले जातात. दर 15 दिवसांनी पोलीस व सैन्य भरतीच्या धर्तीवर मैदानी+लेखी स्वरूपात परीक्षा घेतल्या जातात.
तसेच नियमितपणे अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन असते. या मार्गदर्शनाच्या जोरावर हे विद्यार्थी देश सेवेसाठी कणखर होतात. देश सेवेसाठी जवान घडवण्याचा वसा या संस्थेने घेतला असून त्याद्वारे अनेक जवान देशाच्या सीमेचे रक्षण करीत असून अनेक सज्ज आहेत, हेच या संस्थेचे यश असल्याचे, प्रा. अशोक वंजारे हे अभिमाने सांगतात. या संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या कमवा व शिका, दत्तक योजनेद्वारे आज आदिवासी, गरजू, होतकरू विद्यार्थी उच्च ध्येय बाळगत यशस्वी वाटचाल करीत आहेत. खेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलिसांना संस्थेसह संस्थेतील विद्यार्थ्यांचे कायम सहाय्य लाभत आहे. गगनभरारी अकॅडमीचा शिक्षकवर्ग अत्यंत विद्याविभूषित आणि स्पर्धा परीक्षेची जाण असणारा आहे. यामध्ये प्रा. स्वप्नील सांडभोर (पीएसआय), प्रा. महेश निकस, प्रा. विजय पाटील, प्रा. गोविंदा पवार, प्रा. सागर बच्चे, प्रा. सागर गाडे, बाळनाथ माळी यांसारख्या शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत आहे. अकॅडमीमध्ये चझडउ/झडख/डढख/अडज/ महाराष्ट्र पोलीस/रेल्वे पोलीस/सरळ सेवा भरती/सैन्यभरती/तलाठी/वनरक्षक/बॅंकिंग/नेव्ही/ एअरफोर्स या प्रकारचे स्वतंत्र कोर्सेस चालतात. गगनभरारी अकॅडमीच्या माध्यमातून परिसरातील विद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे घेतली जातात. तसेच ट्रॅकिंग कॅम्प, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे तसेच व्यक्तिमत्त्व विकास व विविध शिबिरांद्वारे विद्यार्थी व नागरिकांमध्ये देशसेवा रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अकॅडमीची वैशिष्ट्ये
- डिजिटल क्लासरूम व प्रशस्त बैठक व्यवस्था
- शारीरिक क्षमता चाचणीकरिता प्रशस्त मैदान
- तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग
- दर आठवड्यास विषयानुसार टॉपिक टेस्ट व अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन
- दर 15 दिवसांनी मैदानी व लेखी परीक्षा
- मोफत वायफाय व नोकरीचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा
- संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेरा निरीक्षणात
- मुला-मुलींसाठी हॉस्टेल, मेसची स्वतंत्र व्यवस्था
- वर्तमानपत्रे/मासिके/ पुस्तके/ टेस्ट सिरीज उपलब्ध
- प्रशस्त अभ्यासिका व मेडिटेशन रूम
“”इवलेसे रोप लाविले द्वारी त्या वेलू गेला गगनावरी”
वरील पंक्तीप्रमाणे व याच न्यायाने आमचे गुरुवर्य मा. अशोक वंजारे सर यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या राहत्या घरात 2-4 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी त्याला योग्य दिशा मिळवून देण्याचे कार्य करत असताना सरांनी कधीही हार मानली नाही. विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात, जास्तीत जास्त सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी सरांना खूप अशा समस्यांना तोंड द्यावे लागले. तरीसुद्धा त्यांनी थकून न जाता आपला आत्मविश्वास कधीही ढळू दिला नाही. सरांच्या कार्याबद्दल सांगायचं झालं तर सकाळी ग्राउंडला विद्यार्थ्यांमागे पळणारे सर असतील किंवा लेक्चर्समध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी विनोदी शैलीने शिकवणारे सर असतील. अशा वेगवेगळ्या भूमिकेतून समोर येणारे सर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी परमेश्वराचे प्रेमच जणू. गरीब परिस्थिती असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना विना फीमध्ये प्रशिक्षण देऊन त्यांच्या अंधःकारमय जीवनात ज्ञानरूपी प्रकाशाचा दिवा लावण्याचे कार्य सरांनी केले. हे सर्व करता करता छोट्या रोपट्याचा वटवृक्ष केव्हा झाला हे कळलेच नाही.
2-3 विद्यार्थ्यांपासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केलेल्या या प्रशिक्षण सेवा संस्था आज जवळपास 500 पेक्षा अधिक विद्यार्थी एमपीएससी, सरळसेवा, तलाठी, पोलीस भरती, आर्मी भरती अशा विविध पदांसाठी शिक्षण घेत आहेत. “स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर खऱ्याअर्थाने जगलास’ या उक्तीप्रमाणे सरांचे कार्य हा एक व्यवसाय म्हणून पैसे कमविण्यासाठी न करता समाजकार्य आहे, असे देश सेवेत कार्यरत असलेले विद्यार्थी अभिमानाने सांगतात.