भांबोलीचे लोकनियुक्त सरपंच ‘सागर निखाडे’
चाकण एमआयडीसी टप्पा दोन मधील भांबोली (ता. खेड) येथील सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील सागर नावाचा एक युवक, की ज्याने वयाच्या 27व्या वर्षी जनतेमधून बिनविरोध निवड होऊन ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविले. कॉम्प्युटर डिप्लोमा झालेले सरपंच सागर निखाडे यांनी भांबोली गावाला तीन वर्षांच्या कार्यकाळात प्रगतीपथावर नेले. शालेय जीवनापासूनच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्राची आवड असलेल्या सागर निखाडे या तरुण सरपंचाचा कामांचा प्रगतीचा आलेख समाजातील तरुणांना दिशादर्शक व स्फूर्तिदायक ठरेल.
सागरचे यांचे वडील तुकाराम निखाडे यांचे चाकणच्या आंबेठाण चौकात “मटकी भेळ’ साठी प्रसिद्ध असलेले हॉटेल होते. वडिलांना व्यवसायाला हातभार लावत विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना समाज प्रबोधन व जनजागृतीसारखं काम करणाऱ्या ‘वडवानल’ संस्थेच्या माध्यमातून पथनाट्य, एकांकिका व लघुपटात भूमिका करून कलेची आवड जोपासली. सागरने आजवरच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आणि अनुभवले. अशा या हरहुन्नरी युवकाचा अभिनय ते सरपंच पदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. सागरच्या अंगी असलेली इतरांबद्दलची आत्मियता, स्पष्टवक्तेपणा, थोडासा मितभाषी, गरजवंतांना मदतीचा हात देण्याची वृत्ती, समाजहितासाठी प्रसंगी आर्थिक झळ सोसून अंग झोकून काम करण्याची जिद्द, संघटन कौशल्य आदि गुणांमुळे सागर जनमानसांत व तरुण सहकाऱ्यांत लोकप्रिय झाला. सागर यांचे कर्तृत्व, वडिलांचा धार्मिक कार्याचा वसा आणि वारसा, मोठे बंधू कैलास व त्यांच्या शिवशाही ग्रुपची खंबीर साथ आणि परिवाराचे सहकार्य यामुळे भांबोलीच्या सन 2017-2022 या पंचवार्षिक सार्वजनिक निवडणुकीत जनतेतून बिनविरोध निवड होऊन ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविण्याची संधी मिळाली. सागर यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं.
कलेची जाण असणारा व हाडाचा कलाकार असलेले सरपंच सागर निखाडे पुढील काळात समाजोपयोगी उपक्रम राबवून गावातील तरूण सहकाऱ्यांच्या मदतीने विविध योजनांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करणार आहेत. एमआयडीसी टप्पा दोन मधील कंपन्यांच्या सीएसआर फंडातून गावात राहिलेली विकासकामे करणार असून मुख्यत्वे वंझिरा वस्तीच्या शाळेला नवीन इमारत बांधून देण्याचा मानस आहे. नाटक, लघुपट, चित्रपटात कलाकार म्हणून करिअर करणार असल्याचे सरपंच सागर निखाडे यांचे ध्येय आहे.
सरपंच सागर निखाडे यांनी आपल्या सरपंच पदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात गावातील मूलभूत व पायाभूत सुविधांच्या कामांचा धडाकाच लावला. गावाला प्रगतीपथावर नेऊन ठेवले. त्यांनी आजवर केलेली काही उल्लेखनीय विकास कामे
- गावातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण
- स्थानिकांना रोजगार व व्यावसाय वृद्धीसाठी ‘छत्रपती शिवाजी मार्केट’ नावाने वासुली फाटा येथे आठवडे बाजार
- हंट्समन कंपनीच्या सीएसआर फंडातून पॉलीयुरेथीन वेस्ट पासून तयार केलेले आधुनिक मैदानासह शाळेची नवीन इमारत
- स्ट्रिट लाईट, बंदिस्त गटारे
- नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी एटीएम तत्त्वावर पाणी शुद्धीकरण यंत्रणा
- इंडो स्पेस कंपनीच्या सहकार्याने ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प चालू कचरा व्यवस्थापन केले
- प्रकल्पातुन उपलब्ध बायोगॅसचा उपयोग अंगणवाडी पोषण आहार शिजवण्यासाठी मदत
- मतिमंद, अंध, अपंग व अनाथ मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत
- आदिवासी महिलांना स्वयंरोजगारासाठी कुक्कुटपालन व्यवसाय करायला कंपनीच्या सहाय्याने मोफत खुराडे वाटप
- आदिवासी महिलांना स्वखर्चाने तीर्थक्षेत्र सहलीचे आयोजन
- विद्यार्थी गुणवत्ता व व्यक्तीमत्व विकासासाठी कंपन्यांच्या सहकार्याने विविध उपक्रम
- डेलोटो कंपनीकडून गावातील तरुणांना कराटेचं प्रशिक्षण व मोफत साहित्य वाटप
- हंट्समन कंपनीच्या कृषी विकास संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन व औषध फवारणी यंत्र वाटप
- विद्यार्थ्यांना शेतीची माहिती व आवड निर्माण होण्यासाठी मोशी येथील कृषी प्रदर्शन सहलीचे आयोजन
- भांबोलीफाटा ते वासुलीफाटा रस्ता दुरुस्ती
- वृक्षारोपण व लागवड, परसबाग फुलवणे साठी रोपांचे वाटप (1000 फळझाडे व फुलझाडे)
गरजू व्यक्तींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना
सरपंच सागर निखाडे गावाचा सर्वांगीण विकास करत असताना पिंपरी पाईट गटाचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य त्यांना वेळोवेळी लाभले असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेली कामे
- छत्रपती शिवाजी मार्केट मध्ये हायमास्ट दिवा नागरिकांसाठी शौचालयाची व्यवस्था
- ठाकरवस्तीवर सभागृह दुरुस्ती व सभामंडप
- ठाकरवस्तीमधील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण
- सौर दिवे
- ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था (लोखंडी बाकडे)
- गरजू व्यक्तींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना आदि विकास करुन विकास प्रक्रियेत भर टाकली आहे
- माजी आमदार सुरेश गोरे यांच्या आमदार निधीतून भैरवनाथ मंदिरासमोर भव्य सभामंडप उभारण्याचे काम पूर्णत्वास नेले आहे.
‘सरपंच चषक’ क्रिकेटच्या भव्य सामन्यांचे आयोजन करून समवयस्क तरुण सहकाऱ्यांना संघटीत करुन युवाशक्ती गावच्या विकासाकडे वळवली. दरवर्षी शिवशाही ग्रुप व सहकारी वर्गाला बरोबर घेऊन श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगरावर देवदर्शनाला येणाऱ्या भाविकांना फराळ व प्रसाद वाटप केले जाते. त्याचप्रमाणे गावामध्ये दहीहंडी, गणेशोत्सव व नवरात्रौत्सव या सार्वजनिक उत्सवाचे स्वखर्चाने यशस्वी आयोजन करुन बालचमुंसाठी बाल जत्रेचे आयोजन करीत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सरपंच सागर निखाडे अविरत करत आहेत. दरवर्षी सर्व नागरिकांना नूतन वर्षाभिनंदनासाठी करमणुकीचे कार्यक्रम ठेवून आपली सांस्कृतिक व कला विषयीची रुची जपण्याचे कामही ते सहज करतात.
-कैलास निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप
– संकलन –
दत्तात्रय घुलेपाटील, शिंदेवासुली