पुणे – ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दर शनिवारी न्यायालय सुरू राहणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी न्यायालयला सुट्टी असते. मात्र, या दोन्ही महिन्यांत दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी न्यायालय सुरू राहणार आहे. याबाबतचा आदेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी काढला.
12, 15, 17 आणि 18 एप्रिल रोजी न्यायालय बंद होते. त्या दिवसांचे कामकाज भरून काढण्यासाठी 9 आणि 23 ऑक्टोबर, 13 आणि 27 नोव्हेंबर रोजी न्यायालयाचे कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे. वकील आणि पक्षकारांनी कामकाजात सहभागी होण्याचे आवाहन पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतिश मुळीक यांनी केले आहे.