Rahul Gandhi – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून उत्तरप्रदेशातील न्यायालयाने कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा समन्स बजावले आहे. त्यांना ६ जानेवारीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
शहा भाजपचे अध्यक्ष असताना राहुल यांनी त्यांना लक्ष्य करणारी टिप्पणी केली. त्यावरून भाजपचे नेते विजय मिश्रा यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये मानहानीचा दावा दाखल केला. संबंधित प्रकरणी सुलतानपूरमधील न्यायालयाने राहुल यांना याआधी समन्स बजावले.
त्यानुसार, त्यांना शनिवारी (१६ डिसेंबर) हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, राहुल न्यायालयापुढे हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. संबंधित माहिती मिश्रा यांच्या वकिलांकडून देण्यात आली.