नगर -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा व पोलीस प्रशासनाच्या व्हिजिलन्स स्क्वाड च्या वतीने सिव्हिल हडको, प्रेमदान चौक, भूतकरवाडी, बंगाल चौक, तेलीखुंट, कोठला चौक, माळीवाडा परिसरात वेळे पूर्वी दुकाने उघडने, विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली. गेल्या तीन दिवसात 1 लाख 42 हजार 600 रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
व्हिजिलन्स स्क्वाड करून शहरात दोन दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई सुरु आहे.
शुक्रवारी (दि.3) रोजी गंज बाजार, कापड बाजार, बागरोजा हडको, बागडपट्टी, मल्हार चौक, सारसनगर, गुलमोहोर रोड, जोंध बाजार येथे कारवाई करून संबंधित पथकाने 34 हजार 600 रुपयांचा दंड केला. शनिवार (दि.4) रोजी केडगाव, शाहूनगर, भूषणनगर, अंबिकानगर चाणक्य चौक, आनंदऋषीजी हॉस्पिटल परिसर, सावेडी उपनगर, बालिकाश्रम रोड, तपोवन रोड, वाडिया पार्क भागात कारवाई करत 59 हजार 500 रुपये दंड ठोठावला असून एकून तीन दिवसात 1 लाख 42 हजार 600 रुपयांची दंडात्मक कारवाई केली. यापुढे कारवाई अधिक कडक करण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले.
या कारवाईत अधिकारी पाणी पुरवठा विभाग प्रमुख अभियंता रोहिदास सातपुते, यंत्र अभियंता परिमल निकम, आरोग्य अधिकारी डॉ. नरसिंग पैठणकर, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान, स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे, राजेंद्र सामल, बाळासाहेब विधाते, महापालिका कर्मचारी विजय बोधे, गणेश लायचेट्टी, राहुल साबळे, बाळासाहेब पवार, अशोक बिडवे, राजेश आनंद, रवींद्र सोनावणे, किशोर जाधव, भास्कर अकुबत्तीन, पोलीस श्रीकांत खताडे, शरद गांगर्डे, ए. टी. वामन, जे. एल. लहारे, महादेव निमसे, नितीन फुलारी कारवाईत सहभागी झाले होते. करोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीचे पालन करावे, अन्यथा ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार असल्याचे पथकाच्या वतीने सांगण्यात आले.