कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धा : स्कॉर्पियन, ग्लोबल, फ्रेंड्‌स इलेव्हनची आगेकूच

पुणे – पहिल्या अयोध्या वॉरियर्स करंडक अजिंक्‍यपद कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत स्कॉर्पियन क्रिकेट क्‍लब संघ, ग्लोबल वॉरियर्स क्रिकेट क्‍लब आणि फ्रेंड्‌स इलेव्हन क्‍लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेत आगेकूच केली.

कटारिया हायस्कूल, मुकुंदनगर मैदानावर झालेल्या सामन्यात बंटी राईकर याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे स्कॉर्पियन क्रिकेट क्‍लबने फार्मा इलेव्हन संघाचा पराभव 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना फार्मा इलेव्हनने 20 षटकांत 7 गडी गमावून 195 धावा जमविल्या.

यामध्ये गणेश आंब्रे याने सर्वाधिक नाबाद 79 धावा केल्या, तर राकेश शिंदे याने 50 धावांची खेळी केली. हे आव्हान स्कॉर्पियन क्रिकेट क्‍लबने 18.4 षटकांत व 5 गडी गमावून पूर्ण केले. ओंकार शिंदे (57 धावा), बंटी राईकर (नाबाद 40 धावा), सचिन कांगारकर (नाबाद 20 धावा), महेश शिंदे (30) व सुयश भट (20 धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाने सहज विजय मिळवला.

सुजित उबाळेच्या नाबाद 62 धावांच्या जोरावर ग्लोबल वॉरियर्स क्रिकेट क्‍लबने कल्याण इलेव्हन संघाचा 7 गडी राखून पराभव केला. कल्याण संघाने उभे केलेले 136 धावांचे आव्हान ग्लोबल वॉरियर्स क्रिकेट क्‍लबने 14 षटकांत व 3 गडी गमावून पूर्ण केले. अमित गणपुळे याच्या नाबाद 102 धावांच्या जोरावर फ्रेंड्‌स क्रिकेट क्‍लबने बिग मिशन फाउंडेशन संघाचा 150 धावांनी धुव्वा उडविला.

संक्षिप्त धावफलक –

1) फार्मा इलेव्हन ः 20 षटकांत 7 बाद 195 धावा. (गणेश आंब्रे नाबाद 79, राकेश शिंदे 50, तुषार क्षीरसागर 2-27, पराभूत वि. स्कॉर्पियन क्रिकेट क्‍लब ः 18.4 षटकांत 5 बाद 200 धावा. (ओंकार शिंदे 57, बंटी राईकर नाबाद 40, अमोल लहासे 2-21). सामनावीर ः बंटी राईकर.

2) कल्याण इलेव्हन ः 20 षटकांत सर्व बाद 136 धावा. (रोहित गुगळे 30, सौरभ मांजरामकर 4-22, पराभूत वि. ग्लोबल वॉरियर्स क्रिकेट क्‍लब ः 14 षटकांत 3 बाद 137 धावा. (सुजित उबाळे नाबाद 62, रोहित ठाकूर 1-14). सामनावीर ः सुजित उबाळे.

3) फ्रेंड्‌स क्रिकेट क्‍लब ः 20 षटकांत 3 बाद 248 धावा. (अमित गणपुळे नाबाद 102, सौरभ रवालिया 65, प्रफुल्ल मानकर नाबाद 26, श्रीनिवास सरवदे 24, अमित उमरीकर 1-34) वि. वि. बिग मिशन फाउंडेशन ः 15.5 षटकांत सर्वबाद 98 धावा. (अनुप ढवळे 33, आदित्य पाळंदे 18, महेश शिंदे 3-23, देविदास दुरगडे 3-22). सामनावीर ः अमित गणपुळे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.