पूर्वी आणि अजूनही उपवास करण्याचे प्रमाण, खास करून महिलावर्गात फार मोठे आहे. यामागे धार्मिक कारण, भक्तिभाव असतो.मात्र सद्य परिस्थितीत कोरोना व्हायरस विरोधातील या युद्धातच लोकं आपल्या घरांमध्ये सण साजरे करत आहेत. सध्या मुस्लिम समाजाचा रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात ते रोजा म्हणजे उपवास करतात. मात्र ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांनी उपवास करणं योग्य की अयोग्य आहे?
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या आणि इतर आजाराच्या रुग्णांनीही उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. कारण एखाद्या रुग्णाला व्हायरसचं संक्रमण किती आहे आणि उपवासामुळे त्याला काही नुकसान तर होणार नाही ना हे फक्त डॉक्टरच सांगत आहे.
मुस्लिम धर्मात वय, आजार, गर्भवती महिलाआणि प्रवासी आणि काही विशेष परिस्थितीत उपवासात काही प्रकारच्या सूट आहेत. त्यामुळे शक्य असेल तर उपवास टाळावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.