नवी दिल्ली – चीननंतर आता दक्षिण कोरिया COVID-19 च्या उद्रेकाचा सामना करत आहे. बुधवारी दक्षिण कोरियामध्ये संसर्गाची 4 लाखांहून अधिक प्रकरणं नोंदवली गेली.
दक्षिण कोरियातील माध्यमांनुसार, देशात एका दिवसात 4,00,741 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली, जी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये देशात प्रथम कोविड-19 प्रकरणाची नोंद झाल्यापासून सर्वाधिक आहे.
यापैकी बहुतांशी सामूहिक संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली असून देशात करोनाचे सामूहिक संक्रमण सुरू झाल्याचे सांगण्यात आलं आहे.
दुसरीकडे चीनला देखील करोनाच्या उद्रेकाचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे लाखो लोकांना लॉकडाउनचा सामना करावा लागतोय. चीनमध्ये बुधवारी 3,290 नवीन COVID-19 प्रकरणे नोंदवली गेली, ज्यात 11 गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. 2019 च्या उत्तरार्धात चीनच्या वुहानमध्ये विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं.
कोविड प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्याने शेन्झेनच्या दक्षिणेकडील टेक हबमधील सुमारे 17.5 दशलक्ष रहिवाशांना लॉकडाऊनचा सामना कराव लागत आहे. याशिवाय शांघाय आणि इतर शहरांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत.