महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी असा इशारा दिला होता की पृथ्वीवरील लोकसंख्या खूप वेगाने वाढत आहे आणि ऊर्जा वापरली जात आहे. असेच चालू राहिले तर येत्या ६०० वर्षांत पृथ्वी आगीचा गोळा बनेल. स्टीफन हॉकिंग यांनी १४ मार्च २०१८ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना विश्वाविषयी जाणून घेण्याची इच्छा होती. स्टीफन हॉकिंग यांना वयाच्या २१ व्या वर्षी न्यूरोडीजनरेटिव्ह आजाराचे निदान झाले. यामुळे ते व्हीलचेअरवर आले. मात्र असे असतानाही त्यांनी हिंमत हारली नाही.
न्यूरोडिजेनरेटिव्ह आजारामुळे त्यांना आवाज गमवावा लागला, पण स्टीफन हॉकिंग लोकांशी ‘स्पीच जनरेटिंग डिव्हाईस’ वापरून बोलायचे. त्यांनी अनेक तत्त्वे जगाला समजावून सांगितली. स्टीफन हॉकिंग यांनी संशोधनाद्वारे विश्वाची अनेक रहस्ये उलगडली आहेत, ज्यामध्ये बिग बँग आणि कृष्णविवरांसह अनेक सिद्धांतांचा समावेश आहे. कृष्णविवरांबद्दल जगाला यापूर्वी कोणतीही माहिती नव्हती, पण स्टीफन हॉकिंग यांनी या रहस्यमय ‘ब्लॅक होल’बाबतचे रहस्य उलगडले. 1971 मध्ये पहिले कृष्णविवर सापडले.
स्टीफन हॉकिंग यांनी 1974 साली जगाला ब्लॅक होल अर्थात कृष्णविवर सिद्धांताची माहिती दिली. ते म्हणाले की कृष्णविवर क्वांटम इफेक्टमुळे उष्णता नष्ट करतात. यानंतर त्यांची केंब्रिज विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.
1998 मध्ये स्टीफन हॉकिंग यांचे ‘अ ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाइम’ (A Brief History of Time) हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी बिग बँग थिअरी आणि ब्लॅक होल सोप्या पद्धतीने स्पष्ट केले आहे. सामान्य वाचकालाही ते सहज समजू शकते. या पुस्तकासाठी स्टीफन हॉकिंग यांनाही जनतेच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. देव नाही असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे.
दुसऱ्या ग्रहावर राहावे लागेल
शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग म्हणाले की, आपल्याला दुसऱ्या ग्रहावर जीवन वसवावे लागेल. तसे झाले नाही तर हवामान बदल आणि विध्वंसक कृतींमुळे मानवी सभ्यता संपुष्टात येईल.