बेल्हे – बेल्हे (ता.जुन्नर) येथील एका संशयित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. थोरात यांनी दिली. हा संशयित रुग्ण मुंबई येथून रविवार (दि.१४) रोजी गावी आला होता. मुंबई वरून आल्यापासून हा रुग्ण विलीगिकरण कक्षात होता. या रुग्णाला ताप चढणे उतरणे ही लक्षणे असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तीची कोरोना टेस्ट शुक्रवार (दि.१९) रोजी घेण्यात आली होती.
सदर व्यक्तीला शुक्रवारी लेण्याद्री येथील कोविडं सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीचा रिपोर्ट सोमवार (दि.२२) रोजी सकाळी आला असून तो निगेटिव्ह आला आहे. सदर व्यक्तीला लेण्याद्री येथील कोविडं सेंटरमधून आज डिस्चार्ज केले जाणार असून खबरदारी म्हणून १४ दिवस पुन्हा विलीगिकरण कक्षात ठेवणार असल्याची माहिती डॉक्टर एस.बी. थोरात यांनी दिली.