नवी दिल्ली – देशात करोनाची चिंता दिवसांदिवस वाढतच जात असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 58 हजार 97 नवीन करोना रुग्णांची भर पडली आहे. यासह 534 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दररोज करोना रुग्णांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून आहे यामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 2लाख 14 हजार 4 झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 82 हजार 551 झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल 15 हजार 389 लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 21 हजार 803 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.