मुंबई – सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘दीपिका पादुकोण’ने आतापर्यंत अनेक एकापेक्षा एक हीट चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. आज (5 जानेवारी) ला दीपिका तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. यातच वाढदिवस निमित्त सोशलवर तिच्या फॅन्सकडून तिला शुभेच्छा देण्यात येत आहेत तर दुसरीकडे काही सोशलवर तिचा एक विवादित किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे.
गेल्या काही वर्षात दीपिका तिच्या चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत होती. यातील तिचा एक व्हिडियो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडियोत तिच्या सोबत अन्य अभिनेत्रीही दिसून येत आहे.
हा व्हिडीओ दीपिकाने महिलांबद्दल शेअर केला होता. अभिनेत्रीने यामध्ये म्हटलं होत. ‘लग्नाआधी सेक्स ही महिलेची चॉईस आहे’. दीपिकाच्या या वाक्याने खळबळ माजली होती. अभिनेत्रीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. तिच्या या व्हिडिओला कडाडून विरोध करण्यात आला होता.