Coronavirus: अ‍ॅम्ब्युलन्सअभावी करोनाबाधित भावाला पाठीवर आणले रुग्णालयात

गोरखपूर – करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातले आहे. रुग्णसंख्या वाढीमुळं आरोग्य यंत्रणाही हतबल झाल्याचं चित्र आहे. रुग्णवाढीत महाराष्ट्र आघाडीवर होते, आता देशातील इतर राज्यांना करोनाचा फटका बसत आहे. उत्तर प्रदेशातील स्थिती अजुनच बिघडली आहे. रुग्णांना बेड मिळणंही कठीण झालं असून गोरखपूरमधील दवाखान्यांतून धक्कादायक चित्र समोर आलं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान असलेल्या गोरखपूर जिल्ह्यातील स्थिती बिकट झाली आहे. येथील मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांना अ‍ॅम्ब्युलन्स आणि स्ट्रेचर मिळणेही कठीण झालं आहे. त्यामुळे येथे रुग्णाला त्याच्या नातलगांनी पाठीवर टाकून आणलं. एकजण आपल्या करोनाबाधित भावाला पाठीवर घेऊन रुग्णालयात घेऊन आला. मात्र दुर्दैवाने या रुग्णाने रुग्णालयाच्या काऊंटरवरच प्राण सोडले. रुग्णाला रुग्णवाहिका आणि स्ट्रेचर मिळाला नसल्याची टीका होत आहे.

दरम्यान, बीआरडी मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांना विचारले असता आपल्याला या घटनेबाबत काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच रुग्णालयामध्ये स्ट्रेचर हे रोडवर नाहीत तर वॉर्डमध्ये असतात असेही त्यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.