‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करणारे तिघे अटकेत; 35 हजारांना विकत होते एक इंजेक्शन

नागपूर  – नागपूर शहरात रेमडेसिविर या करोनावरील औषधाचा काळाबाजार करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी आज अटक केली आहे. शुभम पणतावणे (वय 24), प्रणय येरपुडे (21) आणि मनमोहन मदत (21) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ते रेमडेसिविरचे एक इंजेक्‍शन 35 हजार रुपयांना विकत होते. त्यांना वर्धा रोड येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून या औषधांचे दोन डोस आणि मोबाइल जप्त करण्यात आले आहे.

या औषधांचा सध्या सर्वत्र मोठा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा सर्व देशभरच काळाबाजार सुरू आहे. रुग्णांच्या हतबल नातेवाइकांकडून वाटेल ती किंमत मोजून हे औषध सध्या घेतले जात असल्याने त्याचा छोट्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र काळाबाजार सुरू आहे. त्यावर आता पोलिसांनी बारीक नजर ठेवून कारवाया सुरू केल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.